भुसावळात 17 जून रोजी रेल्वेची पेन्शन अदालत

0

भुसावळ- सेवानिवृत कर्मचार्‍यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी सोमवार, 17 जून रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ डीआरएम कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी आपल्या तक्रारीचे अर्ज (तीन प्रतीत) वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी, भुसावळ यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. अर्जात आपले नाव, पद, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरुप इत्यादी नमूद करावे व अर्जसोबत पास बुकाची झेरॉक्स तसेच पीपीओ ची झेराक्स जोडावी तसेच अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.