भुसावळात 17 रोजी कुस्त्यांची आम दंगल

0

भुसावळ– शहरातील खडका चौफुली, एसी केला गोडाऊनजवळ शनिवार, 17 रोजी दुपारी चार वाजता कुस्त्यांची आम दंगल होणार आहे. हाजी इकबाल पहेलवान नगरसेवक व्यायाम शाळा व हिंदु-मुस्लिम एकता कमिटीतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. प्रसंगी मध्यप्रदेश केसरी रेहान गामा खान विरुध्द महाराष्ट्र चॅम्पियन हर्षद सद्गीर (नाशिक) यांच्यासह विदर्भ केसरी गज्जू पहेलवान (हिंगोली) विरुध्द मालवा केसरी आसीफ पहेलवान (उत्तर प्रदेश), उपमहाराष्ट्र चॅम्पियन अझहर पटेल पहेलवान (औरंगाबाद) विरुध्द नाशिक विभाग चॅम्पियन धर्मा शिंदे पहेलवान (मनमाड) यांच्यात कुस्तीची लढत होईल. याशिवाय सुमारे 200 लहान-मोठ्या कुस्त्यांच्या दंगली होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी एका पत्रकान्वये केले आहे.