भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे गाड्या आरक्षीत असल्या तरी काही प्रवासी नियमांचे उल्लंघण करीत असल्याने अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी भुसावळ स्थानकावर सोमवारी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. 173 प्रवाशांकडून तब्बल 93 हजार 530 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने फुकट्या प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भुसावळ स्थानकावर धडक तपासणी मोहिम
वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.), मंडळ मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलिया आणि विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तिकीट तपासणी मोहिम आयोजित करण्यात आली होती. या मोहिममध्ये एकूण 173 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आला. 18 तिकीट तपासणी कर्मचारी आणि चार आर.पी.एफ कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण 93 हजार 530 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. दंड न भरणार्या दोन प्रवाशांवर रेल्वे अॅक्ट 138 नुसार तर रेल्वे अॅक्ट 137 नुसार पाच केसेस करण्यात आल्या.