भुसावळ – रेल्वे कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे पेन्शन अदालतीचे मंगळवार, 18 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. डीआरएम कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये सकाळी 11 वाजता होणार्या पेन्शन अदालतीत तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांनी पेन्शन संदर्भातील तक्रारींबाबत तीन प्रतींमध्ये वरीष्ठ कार्मिक अधिकारी, भुसावळ यांच्या नावाने आपल्या संपूर्ण नाव, पदनाम, भरती तारीख तसेच सेवानिवृत्तीच्या तारखेसह पाठवाव्यात, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 30 ऑगस्टपर्यंत तक्रारी दाखल करता येणार आहेत.