भुसावळात 2 रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

0

खासदारांचा पाठपुरावा ; जलसंपदा मंत्र्यांसह माजी मंत्री एकनाथराव खडसेंची उपस्थिती

भुसावळ- शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राचा 2 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. भुसावळ येथे स्थानिक स्तरावरच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केला होता. या कार्यालयामुळे परदेशात जाणार्‍या पर्यटकांसह व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती
शहरातील स्थानिक पोस्ट कार्यालयात शनिवार, 2 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील करतील. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुंबई क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा, जनरल पोस्ट मास्तर व्ही.एस.जयशंकर (औरंगाबाद) आदीउपस्थित राहणार आहेत.

पैशांसह व वेळेची होणार बचत -बी.बी.सेलूकर
भुसावळ शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्टची सुविधेमुळे विदेशी जाणांर्‍या पर्यटकांसह विद्यार्थी तसेच व्यापार्‍यांची मोठी सोय होणार आहे. शिवाय भुसावळ परीसरातील नागरीकांनाहीया सुविधेचा निश्‍चित फायदा घता येईल. यापूर्वी पासपोर्टसाठी अनेकांना मुंबई, नाशिक इत्यादी ठिकाणी फेर्‍या माराव्या लागत होत्या परीणामी अनेकांचा वेळ व पैसे वाया जात होते मात्र आता त्यात बचत होणार असल्याची डाक अधीक्षक बी.बी.सेलूकर यांनी दिली.