भुसावळात 24 रोजी सृजन महोत्सवाचे आयोजन

0

इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टॉफ ऑर्गनायझेशनचा उपक्रम

भुसावळ- इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टॉफ ऑर्गनायझेशनतर्फे शहरातील रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात शनिवार, 24 रोजी सृजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता भुसावळ डीआरएम आर.के.यादव भुसावळ विभागातील तिकीट निरीक्षकांना मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, मंडल वाणिज्य प्रबंधक व्ही.पी.दहाट, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक श्याम कुलकर्णी (कोचिंग), सहाय्यक वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार (गुडस्) यांची राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन डीसीटीआय एच.एस.आलुवालिया, आयआरटीसीएसओ मंडल अध्यक्ष संजय कुमार दुबे, मंडल सचिव दयाराम सिंह, कार्यकारी अध्यक्ष विवियन रॉड्रिक्स, मंडल कोषाध्यक्ष व्ही.के.सचान आदींनी केले आहे.