माजी शिक्षकांचा होणार सत्कार ; जुन्या आठवणींना मिळणार उजाळा
भुसावळ– शालेय जीवनात एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, गंमती-जमतीसोबत ज्ञानाजर्नातून आयुष्याच्या प्रवासात गाठलेल्या उत्तुंग शिखरावरील देश-विदेशस्थित विद्यार्थी भुसावळात जमणार असून जुन्या आठवणींना उजाळा देण्यासह त्या काळी शिक्षण देणार्या शिक्षकांचा सहृदय सन्मानही करणार आहेत. अर्थात निमित्त आहे ते शहरातील सेंट अलॉयसीस शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. शनिवार, 2 रोजी होणार्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहेत.
25 वर्षांच्या आठवणींना मिळणार उजाळा
25 वर्षांपूर्वीचे वर्गात असलेल्या मित्र-मैत्रिणी मध्यंतरीच्या काळात एकमेकांशी संपर्क तुटला होता मात्र ध्येयाने पछाडलेल्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा सर्वांना एकत्र आणण्याचा चंग बांधत उपक्रमाची संकल्पना मांडल्यानंतर अन्य माजी विद्यार्थ्यांनी त्यास सकारात्मता दर्शवली. 1992 साली शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी मुंबई, पुण्यासह दिल्ली, कलकत्त्यात स्थायीक झाले आहेत तर काहींनी गरूडझेप घेत अमेरीकेसह मुंबई व सिंगापूरात आपले बिर्हाड हलवले आहे. देश-विदेशातील या सर्व विद्यार्थ्यांच्या होणार्या मेळाव्यासाठी व माजी शिक्षकांच्या सन्मानसाठी सर्वांनाच 2 डिसेंबरची प्रतीक्षा लागली आहे. कारण जुन्या आठवणींना यावेळी उजाळा तो मिळणार आहे.