भुसावळात 25 वर्षीय महिलेवर अत्याचार

0

फारकतीनंतर पतीने मुलांना ठार मारण्याची धमकी देत केले कृत्य

भुसावळ– शहरातील पापा नगरातील 25 वर्षीय महिलेवर फारकतीनंतर पतीने मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना 2017 ते 2018 दरम्यान घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी शेख रहिमोद्दीन कमरोद्दीन (भुसावळ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक अंनिस शेख यांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, मोहम्मदवली सैय्यद करीत आहेत.