भुसावळात 27 वर्षीय युवकाचा खून

भुसावळ : शहरातील पंजाबी मशीद परीसर, आगवाली चाळ परीसरात जुन्या वादातून 27 वर्षीय युवकाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. सुनील अरुण इंगळे (27) असे मयताचे नाव असल्याचे समजते. खुन झाल्याची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे कारण ठोसपणे अद्याप स्पष्ट झाले नसलेतरी जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.