भुसावळात 300 दात्यांनी केले रक्तदान

0

भुसावळ– समाजाचे देणं लागतो या भावनेतून 300 वर दात्यांनी रक्तदान केले. निमित्त होते ते पंचायत समितीच्या शिक्षण विभाग व संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशनच्या विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे. रविवारी शहरातील आर.एस.आदर्श सिंधी हायस्कूलमध्ये आयोजित शिबिरात तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.

यांची होती उपस्थिती
गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, प्रकल्प प्रमुख गणेश फेगडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, रक्तदानात सहभागी होणार्‍या रक्तादात्यांची सूची तयार करून प्रत्येक रक्तदात्याला देण्यात येणार आहे. तसेच शिक्षकाला अथवा कुटुंबाला वा नातेवाईकांना रक्ताची गरज भासल्यास त्यांच्या मदतीसाठी रक्तदाते येतील. प्रथम रक्तदान करणार्‍या स्त्री शिक्षीका व पुरूष शिक्षक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

शिबिरासाठी यांचे परीश्रम
शिबिरासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी, तालुक्यातील मुख्याध्यापक, विविध संघटनांचे पदाधिकारी, यांच्यासह संत निरंकारी फाऊंडेशनचे हिरालाल पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष सुरेश तलरेजा, धुळे येथील डॉ. अनिल कानळे, सिंधी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.सी.मुलचंदानी यांनी परीश्रम घेतले.