भुसावळ : जिल्हा कौशल्य विकास व पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पालिका सभागृहात रोजगार मेळावा घेण्यात आला. या शिबिरात 359 बेरोजगारांनी सहभाग नोंदवला. तर 16 उद्योगांतील 200 जागांसाठी 355 बेरोजगारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व भुसावळ नगरपरिषद यांच्या विद्यमाने शुक्रवारी पालिका सभागृहात रोजगार मेळावा घेण्यात आला.
या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, शहरासह तालुका व विभागातून बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 16 उद्योजकांकडे या मेळाव्यातून 200 जागा भरण्यात येणार होत्या, यासाठी 355 बेरोजगारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या उमेदवारांची आठवड्याभरात अंतीम निवड होईल. अमोल मोहळ यांनी मार्गदर्शन केले.