भुसावळ । महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देशभरात ज्याठिकाणी बैठका होत असतात तेथे 1 मार्च रोजी शासकिय कार्यालये व मुख्यरस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शहरात सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत हे अभियान राबविण्यात आले. यात 596 श्रीे सदस्य सहभागी झाले.
यावल परिसरातही राबविले अभियान
भुसावळसह परिसरातील 19 शासकिय कार्यालये व 13 कि.मी. मुख्य रस्ते असे एकूण 59 हजार 100 चौ.मी.क्षेत्र स्वच्छ करण्यात आले. 20 ट्रक्टरच्या सहाय्याने 48 हजार 500 टन कचरा संकलन करण्यात आला. श्री सदस्यांसाठी 5 रिक्षांच्या माध्यमातुन पिण्याचे पाणी पुरविण्यात येत होते. या स्वच्छता अभियानासाठी 22 पथक तयार करण्यात आले होते. याअंतर्गत यावल येथे 425 श्रीे सेवकांनी 9 शासकिय कार्यालये व 12 कि.मी.रस्ता मिळून 89 हजार 473 चौ.मी.क्षेत्र स्वच्छ केले. 15 ट्रक्टरच्या सहाय्याने 73.42 टन कचरा संकलीत करण्यात आला. या अभियानात 5 रिक्षांव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.