भुसावळात 60 हजार भाविकांनी भंडार्‍यातील महाप्रसादाचा घेतला लाभ

0

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील श्री साई बाबा मंदिरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या भंडार्‍याचा (महाप्रसाद) शहर व तालुक्यातील सुमारे 60 हजारांवर भाविकांनी लाभ घेतला. दुपारी 12 वाजेनंतर महाप्रसादास सुरुवात झाली. रात्री 10 वाजेनंतरही भाविकांची गर्दी कायमहोती. तब्बल दहा तास सुरू असलेल्या या महाभंडार्‍यात साईबाबा मंदिर व साईबाबा ग्रुपच्या पदाधिकार्‍यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे काटेकोर नियोजन केले. रविवारी सकाळी महाअभिषेक, पूजा करण्यात आली. दुपारी महाआरतीनंतर भंडार्‍याला सुरुवात झाली. दुपारी भाविकांना वरण बट्टी, वांग्याची भाजी व शिरा असा महाप्रसाद तर सायंकाळी सात वाजेनंतर खिचडी व शिरा या प्रसादाचे वाटप करण्यात आले. महाभंडार्‍यात बट्टीसाठी तब्बल 55 क्विंटल गहू तर वरणासाठी 400 किलो डाळ वापरण्यात आली. तीन हजार किलोची वांग्याची भाजी व 15 क्विंटलचा शिरा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.