भुसावळ– श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सालाबादाप्रमाणे गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 व 9 रोजी होणार्या व्याख्यानांद्वारे भुसावळकरांना ज्ञानाची ऊब मिळणार आहे. व्याख्यानमालेच्या सातव्या वर्षी सोमवार, 08 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनअभ्यासक किरण पुरंदरे ‘मंतरलेली वाट’ या विषयाद्वारे त्यांचे जंगलातील अनुभव सांगतील तर मंगळवार 9 जानेवारी रोजी ‘भाषा, अध्यात्म व जीवन’ या विषयावर हिंदी क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राधेश्याम यादव हे ‘अजात शत्रू मानवी जीवनाचा’ या तिन्ही विषयावरील परस्पर संबंध उलगडतील.
श्रोत्यांसाठी मोफत बसची व्यवस्था
नाहाटा चौफुली, नवशक्ति आर्केड, पांडुरंग टॉकीज, लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, जुना सातारा चौक, डी.एस. ग्राउंड येथून महाविद्यालयातर्फे मोफत बस सुविधा दुपारी चार पासून उपलब्ध असणार आहे. परीसरातील श्रोत्यांनी गाडगेबाबा व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख आयोजक हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी केले आहे.