भुसावळात 8 रोजी ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन

0

सहा.अधीक्षक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची पत्रकार परीषदेत माहिती

भुसावळ:- जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून 8 एप्रिल रोजी ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शासकीय विश्रामगृहावर सोमवारी रात्री आयोजित पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, शहरात अशा स्पर्धेची गरज होती. भुसावळकर आरोग्याबाबत जागृक नागरीक असून आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचा उद्देश शहरातील जातीय सलाखो कायम टिकून राहण्यासह स्वच्छतेविषयी जनजागृती पसरवणे हा आहे. स्पर्धेसाठी सिद्धीविनायक ग्रुप व आमदार संजय सावकारे यांचे सहकार्य लाभत आहे.

तीन गटात होणार स्पर्धा
शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळील डी.एस.ग्राऊंडवर रविवार, 8 रोजी पहाटे साडेपाच वाजता स्पर्धा होणार असून तीन तीन गटात होणार आहे. स्पर्धासाठी सर्वांसाठी खुली असून त्यासाठी तीन व पाच तसेच दहा किलोमीटर अंतर ठेवण्यात आले आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आयोजकांकडून टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र, मेडल, गुडीबॅग व रिफ्रेशमेंट दिले जाणार आहे. सहभागासाठी दोनशे, तीनशे व चारशे रुपयांची नाममात्र फी असून त्या संदर्भात दोन दिवसात सर्व पोलीस ठाण्यासह नाहाटा महाविद्यालयाजवळ नोंदणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत पारदर्शीपणे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून आरएफआयडी पद्धत्तीने स्पर्धक पळणार असल्याचे नीलोत्पल म्हणाले. स्पर्धेच्या प्रसंगी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, आमदार संजय साकवारे, डीआरएम आर.के.यादव, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील, सिद्धीविनायक इन्फोटेकचे यतीन ढाके, डॉ.तुषार पाटील, शिशीर जावळे, विकास पाचपांडे, मनीष नेमाडे, मनोज पिंपळे, प्रवीण फालक, क्रीडा शिक्षक रमण भोळे, वरुण इंगळे, समीर पाटील, कुशल पाटील, शुभम महाजन आदींची उपस्थिती होती.