भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे कामकाजाला सुरुवात

0

भुसावळ (गणेश वाघ) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून न्यायालयातदेखील महत्वपूर्ण खटल्यांवरच कामकाज सुरू करण्यात आले आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अति महत्वाच्या खटल्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे खटला चालवण्याचे निर्देश असल्याने गुरुवारी अतिरीक्त जिल्हा न्या.भंसाली यांच्या न्यायालयात मारूळ, ता.यावल येथे दोन समाजात झालेल्या हाणामारी प्रकरणी युक्तीवाद होवून दोघा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. भुसावळात न्यायालय स्थापन झाल्यानंतर प्रथमच व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे कामकाज झाले, हे विशेष !

व्हि.सी.द्वारे झाला युक्तीवाद : दोघा आरोपींना जामीन
मारूळ येथील घटनेप्रकरणी संशयीत आरोपी कारागृहात होते. या आरोपींच्या जामिनाबाबत व्हि.सी.द्वारे सुनावणी झाली. आरोपींतर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी युक्तीवाद केला. त्यांना अ‍ॅड.जावेद मेमन यांनी सहकार्य केले तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या.भंसाली यांनी आरोपींना 15 हजारांच्या पीआर बॉण्डवर सोडण्याचे आदेश दिले. असलम व सुतार अशी जामीन मिळालेल्या संशयीत आरोपींची नावे असून त्यांना 5 मे पर्यंत जामीन मंजूर करण्या आला आहे. दरम्यान, अ‍ॅड.जगदीश कापडे यांनीदेखील एका खटल्याप्रकरणी व्हि.सी.द्वारे बाजू मांडल्याचे सांगण्यात आले.