भुसावळ : भुसावळात आगारातील 14 कर्मचार्यांना निलंबीत करण्यात आल्यानंतर अंतमी सुनावणीसाठी बोलावण्यात आले मात्र त्यानंतरही संबंधित कर्मचारी न आल्याने त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई मंगळवारी करण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, संपात सहभागी असलेल्या कर्मचार्यांवर सातत्याने कारवाई होत असताना त्यांनी विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे.
सूचना देवूनही उपस्थिती देणे टाळले
8 नोव्हेंबरपासून एस.टी.कर्मचार्यांचा संप कायम असून नोव्हेंबरमध्ये 14 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर या कर्मचार्यांना त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्याकडे बोलाविले मात्र त्यांनी वारंवार सूचना मिळाल्यानंतरही सुनावणीला जाण्यास टाळाटाळ केल्याने महामंडळाच्या सेवेतून त्यांना बडतर्फ करण्यात आले. महामंडळाचे हे जुने कर्मचारी आहेत. यात पाच चालक, आठ वाहक आणि एक मॅकेनिकल अशा 14 जणांवर कारवाई झाल्याने एस.टी.कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली.