भुसावळ आगारातील पहिल्या महिला चालक माधुरी भालेराव यांचा पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांनी केले स्वागत
भुसावळ
भुसावळ येथील एसटी आगारात नुकत्याच नव्याने प्रथमच रुजू झालेल्या प्रथम बसवाहन चालक सौ माधुरी ताई भालेराव यांचे 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती व स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे निमित्त साधून पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे व हरित शहर स्वच्छ शहर संकल्पना राबविणारे नाना पाटील सर यांनी बस स्थानक येथे जाऊन त्यांचा सत्कार केला त्यावेळी आगार व्यवस्थापक राहुल शिवदे व बस स्थानक प्रमुख भोई साहेब तडवी साहेब आदी उपस्थित होते . आज वेगवेगळ्या जोखीम चे काम करण्यासाठी महिला पुढे येत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे समाजाचे काम आहे त्यामुळे अशा असंख्य माधुरी ताई सारख्या महिला पुढे येतील . यासाठी त्यांचा या दिनाचे औचित्य साधून भुसावळ आगारातील पहिल्या महिला चालक म्हणून स्वागत केलें . असे नाना पाटील सर यांनी स्वागत प्रसंगी सांगितले .
यावेळी वाहन चालक माधुरीताई भालेराव यांनीही एक पहिली महिला वाहन चालक भुसावळ आगारात असल्याने अधिकारी वर्गांचेही आणि प्रवासी वर्गांची ही मला सहकार्य मिळत आहे सुरुवातीला आश्चर्यच्या भूमिकेतून माझ्याकडे पाहिले जात होते पण आता स्त्री म्हणून कौतुकही करतात .अत्यंत जबाबदारीचं आवाहनात्मक कार्य आहे .परंतु आनंदाने केलं तर सुखकर वाटते .महिला वर्गांनी या सेवेकडे वळल्यास पुरुषांची मक्तेदारी कमी होईल .असे त्यांनी आवाहन केले .यावेळी आगर प्रमुख राहुल शिवदे यांनीही पहिल्या महिला वाहन चालक माधुरी ताई ठरल्या आहेत . त्या आपली सेवा योग्य प्रकारे बजावत आहेत व वेळोवेळी सहकार्य ही करतात