भुसावळ-इटारसीदरम्यान महिलेची पर्स लांबवली ; 75 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

0

भुसावळ- जबलपूर ते ठाणे प्रवास करणार्‍या महिलेला झोप लागल्याची संधी साधत चोरट्यांनी भुसावळ ते इटारसी दरम्यान पर्स लांबवत 75 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. 1 रोजी ही घटना घडल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शून्य क्रमांकाने हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. भाईंदर मुंबई येथील रहिवासी रूपाली राजेश जडीया या जबलपूर ते ठाणे असा प्रवास एक मार्चला करीत असतांना इटारसी ते भुसावळच्या दरम्यान त्या झोपल्या असता, त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पर्स लांबवली. पर्समध्ये 800 रूपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 75 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी ठाणे जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार संजीवनी तारगे पुढील तपास करीत आहे.