भुसावळ ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे शिक्षकांचा सन्मान

0

भुसावळ- भुसावळ ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे सात शिक्षकांना नॅशनल बिल्डर अ‍ॅवॉर्ड देवून सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींमध्ये एन.के.नारखेडेचे एस.डी.चिपलूनकर. डी.एस.हायस्कूलचे के.डी.पाटील, नगरालिका शाळा क्रमांक पाचच्या स्नेहलता झांबरे, म्युनिसीपल हायस्कूलच्या संध्या बी.धांडे, नगरपालिका शाळा क्रमांक दोनच्या ललिता पाटील, नगरपालिका शाळा क्रमांक एकच्या साधना एस.महाजन, नगरपालिका शाळा क्रमांक 28 च्या आशा जीवन महाजन यांचा प्रशस्तीपत्र, श्रीफळ व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी इनव्हील क्लब अध्यक्षा सुनीता पाचपांडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे, मोना भंगाळे, सुनीता चौधरी, प्रतीक्षा पाटील, मीनाक्षी धांडे, सीमा सोनार, आदिती भडंग, शर्वरी फालक, पल्लवी वारके व क्लब सदस्या उपस्थित होत्या.