भुसावळ उपविभागात संचारबंदीचे उल्लंघण : 68 जणांविरुद्ध गुन्हे

0

26 वाहने पोलिसांनी केली जप्त : पोलिस उपअधीक्षक उतरले रस्त्यावर

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात संचारबंदी सुरू असून नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केल्यानंतरही काही जण आदेश पायदळी तुडवत विनाकारण शहरात दुचाकीवर हिंडत असल्याने अशांविरुद्ध सोमवारपासून पोलिस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी भुसावळ उपविभागात 40 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊन 16 वाहने जप्त करण्यात आली तर मंगळवारीदेखील पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करीत शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत 17 नागरीकांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून दहा वाहने जप्त करण्यात आली तसेच भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सांगितले.

…तर कारवाई सुरूच राहणार -गजानन राठोड
नागरीकांनी संचारबंदीचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिला आहे. कलम 188 नुसार गुन्हा दाखल असून या कलमानुसार शिक्षा व दंडाची तरतूद असल्याचे ते म्हणाले.