भुसावळ- भुसावळ ऑर्डनन्समधील कर्मचारी असलेल्या हितेश नंदकिशोर चावरीया (37) यांचा बुधवारी दुपारी चार वाजता कामावर असतानाच अति मधुमेह व आजारपणामुळे झाल्याने कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली. सुभाष नगरातील रहिवासी असलेले हितेश हे बुधवारी नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर दुरुस्ती विभागात दुपारी चार वाजता त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी येथील शहर पोलिस ठाण्यात तुकाराम दत्तात्रय शिंगटे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात. मृत चावरीया यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जळगाव येथे नेण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. हवालदार अशोक जवरे पुढील तपास करीत आहे.