भुसावळ ऑर्डनन्स कर्मचारी संपाच्या बाजूने

0

भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डासह संपूर्ण 41 आयुध निर्माणींचे निगमिकरणचा निर्णय मोदी सरकार ने केला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आयएनडीडब्लूएफ व राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीच्या आदेशानुसार देशव्यापी अनिश्चित कालीन संपासाठी मतदान सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी ऑर्डनन्स फॅक्टरी मजदूर युनियनतर्फे (आयएनडीडब्लूएफ) रेस्ट शेड येथे मतदान झाले. सरकार आयुध निर्माणींचे निगूहकरण निर्णावर ठाम असल्याने कामगारांनी संपाचे बाजूने मतदान करून सरकार विरोधी रोष प्रकट करीत अनिश्चित संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
आयुध निर्माणी भुसावळ प्रबंधनच्या वतीने कार्य प्रबंधक रामबंधु मीना यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ कार्य प्रबंधक एस.डी.भंगाळे यांच्या निरीक्षणात श्रम कार्यालयाचे नितीन सोनावणे, ओमप्रकाश स्वामी, नितीन लोखंडे, नविन गायकवाड, ए.एस.शेगोकारे, अमोल तायडे आदींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी आ.नि.कर्मचारी संघाच्या वतीने मतदान घेण्यात येणार आहे. मतदान यशस्वी करण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी मजदूर युनियन व स्थानिक संयुक्त संघर्ष समितीचे सर्व पदाधिकार्‍यांसह किशोर चौधरी, एम.एस.राऊत, नीलेश डी.पाटील, संजय साळुंके, सत्यवान बिन्द्रा, धनराज मानकर, प्रशांत सपकाळे, तुषार आंबेकर, मनीष पवार, प्रकाश नेमाडे, किशोर बाविस्कर, वसीम खान, चेतन चौधरी, राजकिरण निकम, एम.डी.वानखेडे आदींनी परीश्रम घेतले. आयएनडीडब्लूएफ संघटन सचिव सच्चानन्द गोधवानी, दिनेश राजगिरे प्रकाश कदम आदींनी मार्गदर्शन केले.