भुसावळ- भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची डिजिटल वाटचाल सुरू असून विद्युत केंद्राची जमीन मालमत्तेची संपत्ती व्यवस्थापन माहिती (जी.आय.एस. व जी.पी.एस.) सॅटेलाईट इमेज या तंत्रज्ञानाद्वारे अक्षांश व रेखांश डिजिटल स्वरूपात संग्रहित झाली आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची आगामी प्रकल्प नियोजन आणि विकासात अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचे मोलाचे योगदान राहणार आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत नागपूरच्या महाराष्ट्र रीमोट सेन्सिंग प्लीकेशन्स सेंटर या स्वायत्त संस्थेसोबत महानिर्मिती मध्ये याबाबत सामंजस्य करारावर चर्चा झाली आहे.
महानिर्मितीच्या अधिकार्यांना प्रशिक्षण
महानिर्मिती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर वैविध्यपूर्ण विकास प्रकल्पाच्या नियोजनाकरिता जसे, वीज प्रकल्प, राखेवर आधारीत उद्योग समूह, सौर ऊर्जा प्रकल्प, खाणकाम प्रकल्प इत्यादींसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर व अनुषंगिक कागदपत्रे तयार करताना प्रकल्पाची संभाव्य जागा, जागेचा वापर, जागेचे अच्छादन, प्रकल्पासाठी आवश्यक निराळे स्त्रोत तसेच वेल्हाळे तलावातील परीक्षण लगतचे साधन-सामग्री विषयक माहिती तातडीने मिळणे आवश्यक असते. परंपरागत पद्धतीमुळे या कामाला भरपूर वेळ लागत होता मात्र आता प्रकल्प व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात हे प्रणाली तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मात्र यापुढे हे तंत्रज्ञान कसे हाताळायचे याची कार्यपद्धती अवगत करणेही गरजेचे होते. नुकतीच यासंबंधी आयोजित एका कार्यशाळेत या कामाची तांत्रिक माहिती सुद्धा महाराष्ट्र रिीमोट सेन्सिंगच्या तंत्रज्ञांनी महानिर्मिती अधिकार्यांना दिली. या दोन्ही विभागाच्या अधिकार्यानां यासंबंधी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. या चर्चेमध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज आबासाहेब सपाटे व स्थापत्य विभागाचे अभियंते यांच्यात चर्चा यशस्वी झाली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आगामी काळात जमीन संपत्ती विषयक प्रश्न सहज सुटतील. व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल गतिमानतेने वाटचाल करणे सुकर होणार आहे.