भुसावळ कार्यक्षेत्रात भरारी पथकांची धडक कारवाई; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त भुसावळ येथील विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व समातपासणीची कार्यवाही
भुसावळ प्रतिनिधी दि 19
– येथील विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व समा तपासणी नाका,अति. भरारी पथक पुर्णाड पथकाची अवैध हातभट्टी दारु निर्मीती व विक्री केंद्रांवर मोठी धडक कारवाई करीत ४०,५७,५९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २९८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन हातभट्टीची वाहतुक करतांना १३ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी संचालक, अं. व दक्षता सुनील चव्हाण तसेच विभागीय उप आयुक्त श्री. डॉ. बी. जी. तडवी नाशिक विभाग नाशिक व अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांचे गावठी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेशानुसार (ता. १) एप्रिल ते अद्यापावतो विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ जि. जळगाव आणि निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिमा तपासणी नाका, अति. भरारी पथक पुर्णाड पथकाने भुसावळ कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल, बोदवड आणि चोपडा तालुक्यातील गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे व विक्री केंद्रांवर वारंवार छापे टाकून धडक मोहिम राबवली यात एकूण १.२३.९२० लि. रसायन आणि ६९०६ लि. गावठी हातभट्टी दारु नष्ट करण्यात आली. तसेच गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायनाचे प्लॅस्टीक व पत्री इम जप्त करण्यात आले. एकुण रु. ४०,०७,५००० या मुद्देमाल मिळून आला…
सदर मोहिमेत हातभट्टी निर्मिती व विक्री करणा-या विरोधात एकूण २९८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन हातभट्टीची वाहतुक करतांना एकुण १३ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच विभागातील एकुण ४० सराईत गुन्हेगारांवर कलम १३ नुसार कारवाई करण्यात आलेली आहे. सदर मोहिमेत विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, अन्वर खतिब, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, सतिष कैलास पाटील, आमोद भडगे तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक आय. बी. बाविस्कर, नरेंद्र पाटील, जवान सर्वश्री नितीन पाटील, अमोल पाटील, योगेश राठोड, कुणाल सोनवणे, नंदु नन्नवरे, शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. या पुढेही निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, चोरवड, यावल व रावेर तालुक्यांत धडक मोहिम राबवून अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती विक्री करणा-या विरोधात कारवाया सुरूच राहतील.