भुसावळ कृउबा संचालक गुड्डू अग्रवाल यांना दिलासा ; अपात्रतेची याचिका फेटाळली

0

भुसावळ- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र (गुड्डू) बिरदीचंद अग्रवाल यांना अपात्र करण्यासंदर्भात सभापतींनी जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी फेटाळल्याने अग्रवाल यांना दिलासा मिळाला असून त्यांचे पद कायम राहिले आहे. कृउबाचे परवानाधारक व्यापारी अग्रवाल यांचे अनुज्ञप्ती नुतनीकरण अर्ज नामंजूर झाल्याने त्यांना संचालक पदावरून अपात्र करण्यासंदर्भात मागणी करीत प्रस्ताव सादर केला.