भुसावळ : शहरातील आंबेडकर नगरातील रहिवासी सुनील इंगळे (28) या युवकाच्या खून प्रकरणी अटकेतील आरोपी शाहबाज शाह याला अटक करण्यात आल्यानंतर रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शिवीगाळ केल्याने खून
मयत व संशयीत पंजाबी मशिदीजवळील मोकळ्या मैदानावर शनिवारी मध्यरात्री बसले असताना उभयंतांमध्ये वाद झाल्याने शाहबाज शहाने मित्र सुनीलवर चाकूने वार करीत दगड मारत त्याचा खून केला होता. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयात डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पोलिस कोठडीची मागणी करीत पोलिसांची बाजू मांडली. यावेळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक निरीक्षक संदीप दुणगहू यांची उपस्थिती होती. दरम्यान, सुनील हा त्याची दुचाकी घेऊन घटनास्थळी आला होता, त्याची दुचाकी संशयीत शहाने लपवून ठेवल्यानंतर चौकशीत दुचाकी (एम.एच.19 डी.डी. 3836) आरोपीने काढून दिली.