भुसावळ खून प्रकरण ; आरोपी प्रल्हाद सचदेव पोलीस कोठडीत

0

भुसावळ- जुन्या वादातून शहरातील पंचशील नगरातील 28 वर्षीय युवक आनंद अशोक वाघमारेचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रल्हाद होलाराम सचदेव (भुसावळ) याने रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खून केला होता. आरोपीला सोमवारी दुपारी तळवेल येथून नातेावईकांकडून अटक करण्यात आल्यानंतर त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्या.पी.ए.पाटील यांनी 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपीने नेमका खून का व कशासाठी केला याबाबत माहिती घेतली जाणार असून गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करण्यात येणार आहे. बाजारपेठ पोलिसांतर्फे तपासाधिकारी उपनिरीक्षक अंनिस शेख यांनी बाजू मांडली तर सरकारतर्फे अ‍ॅड.नवाब अहमद यांनी युक्तीवाद केला.