भुसावळ : भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असतांनाही भाजपाच्या चिन्हावर निवडून न आलेल्या व अपक्ष नगरसेवक असलेल्या हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांना पालिकेतील सत्ताधार्यांनी गटनेता बनवल्याने सर्वांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या जनआधार विकास पार्टीने जिल्हाधिकार्यांकडे दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांसह भाजपाच्या 29 नगरसेवकांना अपात्र का करण्यात येवू नये? या आशयाची नोटीस बजावल्यानंतर 11 रोजी याप्रकरणी व्यक्तिशः वा वकीलासह व आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे बजावले होते. सोमवारी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, बोधराज चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे आदींनी जळगाव येथे हजेरी लावली. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 रोजी होणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.