भुसावळ गोळीबारातील जखमीचा अखेर मृत्यू

0

भुसावळ- शहरातील दहा बंगला भागातील रेल्वे कर्मचारी  याकूब डॅनियल जॉर्ज (37) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवार, 9 एप्रिल रोजी रात्री उघड झाली होती. या प्रकरणी जखमी कर्मचार्‍याच्या पत्नीने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तथा जखमीचा चुलत शालक बॉबीसिंग विरेंद्रसिंग ठाकूर (44) याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, जखमी असलेल्या याकूब जॉर्ज यांच्यावर गोदावरी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी अटकेतील आरोपी बॉबीसिंग ठाकूरविरुद्ध खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सांगितले.