भुसावळ: बसस्थानकात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणी अटकेतील मुख्य आरोपी अजय गोडालेसह साथीदार किसन पचेरवालच्या ताब्यातून गावठी कट्टा व दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. गुरुवारी रात्री बसस्थानकातील शौचालयाच्या कक्षात आरोपींनी मद्यपान करीत असताना सचिन लक्ष्मण सरोदे (25, यावल) वर गोळी झाडल्याने तो जखमी झाला होता तर त्याच्यासह शौचास आलेल्या दीपक काटकरला कट्ट्याच्या धाकावर आरोपींनी पळवून नेले होते मात्र काटकर कशीबशी आपली सुटका केली होती तर सचिनला एका ढाब्यावर सोडून आरोपींनी पलायन केले होते.