भुसावळ गोळीबार प्रकरण ; दिलीप पचेरवालला अटक

0

भुसावळ– सहकार्‍यावर रूबाब झाडण्यासाठी मद्यधूंद अवस्थेत अजय गिरधारी गोडाले याने आपला सहकारी सचिन सोनवणे (25, रा.सावदा) वर 22 जानेवारी रोजी गोळी झाडल्याची घटना घडली होती तर भाजीपाला व्यावसायीक दीपक गोपाळ काटकर (38, टींबर मार्केट, भुसावळ) ला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवत आपला खास मित्र किसन पचेरवालसह दुचाकीने वरणगावकडे पळ काढला होता. बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयाच्या एका खोलीत ही घटना घडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दिलीप पचेरवाल यांनी शौचालय पाण्याने धुतल्याची बाब उघड झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी रविवारी पचेरवाल यांना अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. पुरावा नष्ट केल्याचा ठपका आरोपी पचेरवालवर ठेवण्यात आला आहे.