भुसावळ- शहरातील आरएमएस कॉलनीत गेल्या 20 वर्षांपासून पाणीप्रश्न बिकट बनल्याने नागरीकांनी दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडले होते तर आमदार संजय सावकारे यांनी उपोषणार्थींना सहा लाख रुपये खर्चातून या भागात पाईप लाईन टाकण्यासह लवकरच टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी आरएमएस कॉलनीसह भुसावळ ग्रामीण भागात प्रत्येकी एक टँकर मंजूर केला आहे. टँकरमुळे या भागातील नागरीकांना दिलासा मिळणार आहे. टँकरवर जीपीएस प्रणाली लावावी तसेच त्याबाबत अहवाल दररोज सादर करावा तसेच अचानक तहसीलदार, गटविकास अधिकार्यांनी भेट देवून टँकरबाबत तपासणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.