भुसावळ ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू
आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश : ऑक्सीजन जनरेटींग यंत्रणाही होणार कार्यान्वीत
भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालयात शनिवारपासून डेडीकेटेड कोविड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले असून पहिल्याच दिवशी दोन रुग्ण त्यात दाखल करण्यात आले आहेत. आमदार संजय सावकारे यांनी कोविड सेंटर कार्यान्वीत करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रतत्नांना यश आले आहे. आमदार संजय सावकारे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरसाठी संरक्षण कुंपणही मंजूर करण्यात आले असून आमदार निधीतून येथे ऑक्सीजन जनरेटींग प्लाँटलाही मंजुरी मिळाली शिवाय त्याबाबत निविदा काढण्यात आली आहे तसेच रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका मंजूर झाली असून ती रुग्णांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे.
वरणगावात सोमवारपासून व्हॅक्सीनेशन
वरणगाव येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.
शवविच्छेदनासाठीचे हेलपाटे थांबणार
जंक्शन स्थानक असलेल्या शहरात शवविच्छेदनाची सोय नसल्याने अपघात तसेच अप्रिय घटनेत मयत झालेल्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. या संदर्भात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष सुरू करण्यासंदर्भात वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने या कक्षालाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.