भुसावळ चाकू हल्ला प्रकरण : संशयीतांना न्यायालयीन कोठडी

0

भुसावळ- खुर्चीवर उठ सांगितल्याचा राग आल्यानंतर जामनेर रोडवरील कुणाल बियर शॉपीचे चालक नितीन मोहन ठाकूर (43, कस्तुरीनगर, रेणुका डेअरीजवळ भुसावळ) यांच्यासह त्यांचे बंधू दिलीप मोहन ठाकूर, कृष्णा मोहन ठाकूर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना सोमवार, 22 रोजी रात्री दहा वाजता घडली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी भागवत सावकारे, धीरज वारके, मयुर सपकाळे, जयेश पाटील, सुशील झोपे, प्रवीण शेलार, वैभव पाटील, मोहित चौरसिया, गोपीनाथ भोपाळ, भूषण झोपे, कृष्णा कुतुलुलु, अभिजीत मराठे यांच्याविरुद्ध भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींची कोठडी संपल्याने त्यांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, आरोपींना भेटण्यासाठी न्यायालयाच्या आवारात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.