भुसावळ चाकू हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यू

0

सहा दिवसीय झुंजीचा अखेर ; आरोपींविरुद्ध गुन्ह्याचे कलम वाढणार

भुसावळ- मित्राच्या बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधातून वाद उफाळल्याने शहरातील आनंद नगरातील रहिवासी असलेल्या जय अशोककुमार दुधाणी (18) या तरुणावर दत्तू जयसिंग राजपूत व निलेश चंद्रकांत ठाकूर यांनी डी.एस.ग्राऊंडवरील मैदानात पार्टीतच वाद घालून त्याच्यावर चाकूने तब्बल 14 वार केले होते तसेच सोबतच्या गिटारनेदेखील मारहाण केली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या जय दुधाणीवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू होते. सहा दिवसांपासून तो देत असलेल्या झुंजीचा शुक्रवारी पहाटे अखेर झाला त्याचा मृत्यू झाला. याबाबत गोदावरी रुग्णालयाच्या प्रशासनाने नशिराबाद पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह जळगावच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

आरोपींविरुद्ध वाढणार खुनाचे कलम
चाकू हल्ल्यातील आरोपी दत्तू राजपूत व निलेश ठाकूर यांना रविवारी रात्रीच शहर पोलिसांनी अटक केली होती तर आरोपी हल्लीतील न्यायालयीन कोठडीत आहेत. जखमीचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302 लावण्यात येणार आहे.