खासदार रक्षा खडसे खडसे यांच्या हस्ते होणार लोकार्पण
भुसावळ- जंक्शन स्थानकावरील जुन्या पादचारी पुलास दोन्ही बाजूने सरकते जिने लावण्यात आले असून मंगळवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते जीन्यांचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, डीआरएम आर.के.यादव, सिनियर डीसीएम सुनील मिश्रा, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.
रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार
सरकत्या जिन्यांमुळे जंक्शनच्या दोन्ही बाजूने येणार्या प्रवाशांचा पायर्या चढण्याची गरज उरणार नाही. जुन्या पादचारी पुलास दोन्ही बाजूने सरकते जिने लावल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनादेखील सुविधा मिळणार असून जिन्यांची चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी जिने प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित होणार आहेत.
जंक्शनवरील सरकता जीना
भुसावळ स्थानकावर दोन प्लॅटफॉर्मची उभारणी सुरू असून 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. जुन्या प्लॅटफॉर्मवर केवळ 22 ते 24 डब्यांचीच गाडी थांबू शकते मात्र नवीन प्लॅटफॉर्मची लांबी 550 मीटर असून त्यावर 26 डब्यांची गाडी उभी राहू शकेल. या नवीन प्लॅटफॉर्मची रुंदी 15 मीटर व उंची 84 मीटर असेल. 50 कोटी रूपये खर्चाच्या या कामामुळे नागपूरकडून येणार्या गाड्यांना आउटरला थांबावे लागणार नाही.
उपस्थितीचे आवाहन
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकारी, कार्यकर्त युवा मोर्चा पदाधिकारी, महिला आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे व पवन बुंदेले यांनी केले आहे.