8 जुलै रोजी सुरत पॅसेंजर जळगावपर्यंत धावणार
भुसावळ- भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गावरील भुसावळ, भादली व जळगाव येथे तांत्रिक कामांसाठी रेल्वेने मेगाब्लॉक घेतला असून यासाठी अप-डाऊन महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे तर 8 जुलै रोजी सुरत पॅसेंजर केवळ जळगावपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलाची नोंद घेण्याचे प्रवाशांना आवाहन
7 रोजी कोल्हापूर येथून सुटणारी व 8 रोजी भुसावळात पेाहोचणारी डाऊन 11039 कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र) एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून 9 रोजी गोंदिया येथून सुटणारी व याच दिवशी भुसावळात पोहोचणारी अप 11040 गोंदिया-कोल्हापूर (महाराष्ट्र) एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, 7 रोजी सुरत येथून सुटणारी डाऊन 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर 8 जुलै रोजी केवळ जळगाव स्थानकापर्यंत धावणार आहे.