भुसावळ-जळगाव लाँगमार्चसह खुटी ठोको आंदोलन

0

जगन सोनवणेंचा इशारा ; आरपीडी रस्त्याचे हस्तांतरण टाळण्यासह पाच मागण्यांसाठी तीव्र आंदोलन

भुसावळ- पालिकेच्या अखत्यारीतील आरपीडीरोडचे रेल्वेकडे हस्तांतरण टाळावे, रेल्वेच्या हद्दीतील पाच हजार झोडपट्टी तोडून 20 हजार नागरीक विस्थापीत झाल्याने नुकसानीचे पंचनामे तयार करून प्रत्येक कुटुंबास पाच लाख रुपये भरपाई द्यावी व सातबारा उतारा द्यावा, भुसावळ रेल्वे दवाखान्यामागील समता नगर, आंबेडकर नगर, रूपवते सोसायटी, कंडारी झोपडपट्टी हटवू नये, रेल्वेतील नोकरीसाठी असलेल्या अ‍ॅप्रेंटीस धारकांना नोकरी द्यावी तसेच त्यांच्यावरील गुन्हे रद्द करावे तसेच भुसावळ रेल्वे उत्तर वॉर्डातील भुसावळ पालिकेच्या मालकिच्या जागेवरील बेकायदेशीररीत्या काढलेले अतिक्रमित जागेची मोजणी करून पुन्हा नियमानुसार भाडे कर वसुल करून जागा अतिक्रमितांना द्यावा या पाच प्रमुख मागण्यांसाठी भुसावळ-जळगाव लाँगमार्चसह खुटी ठोको आंदोलन तसेच जिल्ह्यात पाच ठिकाणी रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार नेते तथा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत दिला. यानंतर प्रांताधिकारी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी जगन सोनवणे यांच्यासह रमाई ब्रिगेडच्या जिल्हाप्रमुख संगीता ब्राह्मणे, संजू इंगळे, पीआरपीचे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक अडकमोल, हबीब सुरवाडे, आरीफ शेख, गोपी साळी, महेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.