डीआरएम आर.के.यादव यांची बदली ; दोन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी महानगर रेल्वे विकास निगमचे विवेक कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यादव यांच्या बदलीच्या प्रतिनियुक्तीचे अद्याप कळवण्यात आलेले नाही. यादव यांनी दोन वर्षांच्या काळात भुसावळ रेल्वे स्थानकासह रेल्वे भागाचा चेहरा-मोहरा बदलला होता तर भुसावळ रेल्वेतील हद्दीतील अतिक्रमण हटवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.