रेल्वे अभियंत्यांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन
भुसावळ : रेल्वे अभियंत्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शुक्रवारी दुपारी डीआरएम कार्यायलाबाहेर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. मागण्यांसंदर्भात डीआरएम प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मध्य रेल्वे अभियंता असोसिएशनचे सचिव सुनील फिरके यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पामीर कुमार, धर्मेंद्र कुमार, मुकेश चौधरी, पी.के.जैन, एस.बी.सोनुले यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.