भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानक परीसरात विविधांगी विकासकामांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकाचा लूक बदलण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून रेल्वे प्रवाशांसाठी खास हेरीटेज संग्रलयाची उभारणी केली जात असून तेथे जुन्या काळातील वाफेवर चालणारी रेल्वेगाडी ठेवण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवारी सकाळी सात वाजता डीआरएम कार्यालय ते हेरीटेज संग्रहालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा यांच्याहस्ते वाकिंग रॅलीला हिरवी झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
यांचा होता रॅलीत सहभाग
या रॅलीत वरीष्ठ मंडळ परीचालन अधिकारी स्वप्नील नीला, वरीष्ठ मंडळ यांत्रिक प्रबंधक पी.रामचंद्रन, मंडळ यांत्रिक प्रबंधक लक्ष्मी नारायण, वरीष्ठ विद्युत अभियंता जी.के.लखेरा, मुख्य संरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, स्टेशन निर्देशक जि.अय्यर, मंडळ कार्मिक अधिकारी एम.के.गायकवाड, पर्यावरण व गृह प्रबंधन विभागाचे सिनिअर सेक्शन इंजिनिअर अनंत झोपे, सेन, संतोष श्रीवास, भारत चौधरी, कर्मचारी आणि स्कॉउड गाईडचे सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.