भुसावळ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी स्वीकारला पदभार

0

भुसावळ- भुसावळ तहसीलदारपदी बोदवड तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची बदली झाल्यानंतर त्यांनी नुकताच पदाचा पदभार स्वीकारला. भुसावळ तहसीलदारांचे पद रिक्त असल्याने संजय तायडे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. थोरात यांनी कर्मचार्‍यांची बैठक घेऊन प्रत्येकाकडील कामाचे स्वरूप समजावून घेतले तसेच कामकाजासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या.