भुसावळ तहसीलमधून डंपर लांबवल्याप्रकरणी अखेर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ- शहराच्या तहसील कार्यालयाच्या आवातून चार डंपर लांबवल्यानंतर तहसील प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली केली होती तर 12 ऑगस्ट घडलेल्या या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी शहर पोलिस ठाण्यात शनिवारी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तहसील कार्यालयात 12 ऑगस्ट 2018 रोजी वाळूच्या ट्रक महसूल विभागाने पकडल्या होत्या मात्र त्या ट्रकमधील सुमारे आठ ब्रास रेती चोरून नेण्यात आली होती. 32 हजार रूपये या वाळूची किंमत होती. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून महेद्र रामचंद्र दुसाने यांच्या फिर्यादीवरून समाधान कोळी, संदीप अरविंद पाटील, नरेद्र सपकाळे व मंगळ कोळी (सर्वांचे पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर वाळू चोरी केल्याचा आरोप आहे. प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साहील तडवी पुढील तपास करीत आहे.