भुसावळ:- शहरातील तापी नदीपात्रात एकाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील दीपक ढमढेरे (वय 30, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास वडरवाडीच्या मागे हा मृतदेह आढळला. या संदर्भात शहर पोलिसात अनिल बाविस्कर (आंबेडकर नगर) यांनी खबर दिली. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन देशमुख करीत आहेत.