भुसावळ : तालुका पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरूद्ध धडक कारवाई सुरू केली असून दोन कारवायांमध्ये सुमारे 36 हजारांचे रसायन नष्ट करण्यात आले. पहिल्या कारवाईत वराडसीम शिवारात वाघुर धरणाच्या काठावर सार्वजनिक रमेश तुकाराम शिंदे (रा.वराडसीम) हा वाघूर धरणाच्या काठावर आरोग्यास अपायकारक गावठी हात भट्टीची दारू गाळत असताना पोलिसांनी पाच ड्रममधील 900 लिटर कच्चे रसायन नष्ट केले तसेच तयार हातभट्टीची 25 लिटर तयार जप्त केली. एकूण 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमालम जप्त करण्यात आला. दुसर्या कारवाईत आरोपी रमेश तुकाराम शिंदे याने गावठी दारूभट्टीसाठी लागणारे लागणारे गुळ व नवसागर प्रशांत पद्माकर राणे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याने आरोपीच्या खळ्यातून तीन हजार 500 रुपये किंमतीचा शंभर किलो गुळ तसेच एक हजार 350 रुपये किंमतीचे नवसागरचे नऊ बॉक्स् मिळून चार हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण 36 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , सहाय्यक फौजदार सुनील चौधरी, हवालदार युनूस शेख, नाईक राजेंद्र पवार, राहुल महाजन यांनी केली.