भुसावळ तालुका पोलिसांना आढळली बेवारस दुचाकी

0

भुसावळ- भुसावळ तालुका पोलिसांना विना क्रमांकाची एलएमएल कंपनीची फ्रीडम दुचाकी आढळली आहे. मूळ मालकांनी कागदपत्रे सादर करून वाहन न्यावे, असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे यांनी केले आहे. या वाहनाचा इंजिन क्रमांक एसएसआके 303004 असून चेचीस नंबर 7 आरके 307407 असल्याचेही कळवण्यात आले आहे.