भुसावळ तालुका शेतकी संघासाठी मतदानाला सुरुवात

0
भुसावळ : तालुका शेतकी संघाच्या 15 जागांसाठी रविवारी शहरातील जामनेर रोडवरील म्युन्सीपल हायस्कूलमध्ये सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाचा जोर नसला तरी दुपारून मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक सूत्रांच्या माहितीनुसार सकाळी 11.30 वाजेपर्यंत 304 मतदारांनी हक्क बजावला.
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
भाजपाचे आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार व शेतकरी पॅनलमध्ये काट्याची टक्कर होणार असून निवडणुकीत कोण बाजी मारते?  याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी तापी नगरातील हिंदू हौसिंग सोसायटीत होणार आहे. शेतकी संघाच्या निवडणुकीत 15 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात  आहेत.