भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर जंगलात अत्याचार

भुसावळ : तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात संशयीत आरोपी अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड (फेकरी, ता.भुसावळ) याच्याविरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पाठलाग करीत छेडखानीनंतर केला अत्याचार
भुसावळ तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन तरुणीचा आरोपी अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा बनसोड याने 21 जुलैच्या 2022 पूर्वी दोन वर्ष पाठलाग करीत छेडखानी केली तसेच 21 जुलै रोजी दुपारी दोन वाजता दीपनगर येथील सरगट गेटजवळून अल्पवयीन पीडीतेला तुझ्या काकाबद्दल काही सांगायचे आहे तसेच मोबाईलमधील काही दाखवायचे आहे, असे सांगून गोड बोलून पिंप्रीसेकमच्या जंगलात नेले व तेथे मारहाण करीत पीडीतेवर अत्याचार केला. हा प्रकार पीडीतेने घरी आल्यानंतर कुटूंबियांना सांगितल्यानंतर गुरुवारी रात्री भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.