भुसावळ तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा
BJP flag on three village panchayats in Bhusawal taluka भुसावळ : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत तीन ग्रामपंचायतीत भाजपा पुरस्कृत उमेदवारांची तर दोन ग्रामपंचायतीवर अपक्ष व एका ग्रामपंचायतीवर लोकशाही ग्रामविकास आघाडी सदस्याची सरपंचपदी वर्णी लागली. मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयाबाहेर सहा ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला मात्र पोलिसांनी जामनेर तालुक्यातील अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना लागलीच पांगवले. दरम्यान, तळवेल ग्रामपंचायत सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक पाचमध्ये उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिट्ठीने तेथील निकाल घोषित झाला.
ग्रामपंचायतनिहाय निकाल व विजयी उमेदवार असे
मोंढाळा- सरपंच- रत्नाबाई विलास सुरवाडे (595), प्रभाग एक- जितेंद्र राजू सुरवाडे (206), सचिन पुंडलिक पारधी (189), प्रभाग दोन- पंढरीनाथ संतोष घ्यार (164), रेखा देवचंद परदेशी (160), प्रभाग तीन- प्रशांत शिवराम धनगर (220), प्रमिला रमेश कोळी (237)
कन्हाळा खुर्द – सरपंच- मोहन सदाशीव पाटील (362), प्रभाग एक- प्रियंका मिलिंद चौधरी (84), सरला केवल पाटील (81), प्रभाग दोन- जगदीश वासुदेव इंगळे (126), प्रभाग तीन- दीपक गोपाळ पवार (130), सुमन सुदाम आव्हाड (138)
पिंपळगाव खुर्द – सरपंच- लक्ष्मण बळीराम पाटील (552), प्रभाग क्रमांक एक- निलेश किसन राणे (157), विष्णू राजेंद्र राणे (108), अरुणा गणेश शिंदे (141), प्रभाग दोन- अरविंद एकनाथ महाजन (246), ज्योती नामदेव जोहरे (188), अन्नपूर्णा किरण सोनवणे (269), प्रभाग तीन- समाधान रामराव पाटील (215), उर्मिला रामदास पारधी (339), कल्पना राजेंद्र पाटील (234)
कन्हाळे बु.॥ – सरपंच- रजिया मोहम्मद गवळी (724), प्रभाग एक- राजेंद्र भाऊराव पाटील (317), सोनाली शरद महाजन (298), दुर्गा राजेंद्र मेहेरे (273), प्रभाग दोन- मनोहर तुळशिराम चौधरी (123), गीताबाई रायसिंग पाटील (87), प्रभाग तीन- मोहम्मद नथ्थू गवळी (429)
ओझरखेडा – सरपंच- दिलीप दौलत सुरवाडे (401), प्रभाग एक- मायाबाई उत्तम सुरवाडे (265), भारती पंकज नेमाडे (226), प्रभाग दोन- ज्ञानदेव मुरलिधर झांबरे (203), पल्लवी प्रफुल्ल नेमाडे (160), सावित्री सोपान पाटील (162), अतुल कडू पाटील (215), सरलाबाई राजेंद्र ढाके (233)
तळवेल – सरपंच- विद्या उल्हास भारसके (1250), प्रभाग एक- रत्ना किशोर कोळी (394), स्मिता रवींद्र पाटील (338), सुवर्णा अमोल पाटील (382), प्रभाग दोन- किशोर काशीनाथ कोळी (470), सरीता पंकजा चौधरी (403), मनीषा सुधीर पाटील (418), प्रभाग तीन- उल्हास रामदास भारसके, छाया संतोष पाटील (222), प्रभाग चार- प्रमिला संजय गुरचळ (367), तुषार देविदास पाटील (496), प्रभाग पाच- सोपान मुरलिधर पाटील (319), संतोष ज्ञानदेव झोपे (252), कांताबाई भीमराव गुरचळ (277, ईश्वरचिठ्ठीने).